उपक्रम

  • मिशन नवऊर्जा

    सांगली जिल्हा मधील पूर बाधित गावातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.संग्रामसिंह देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिजित राऊत यांचे मार्गदर्शनाखाली दि 12/08/2019 पासून *मिशन नवऊर्जा* हाती घेण्यात आली आहे. सदर अभियानांतर्गत जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत सर्व विभागप्रमूख, इतर तालुक्यातील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत/ शिक्षण/ संख्यिकी, एकात्मिक बालविकास प्रकल्पाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, उपअभियंता, शाखा अभियंता, अंगणवाडी सुपरवायझर, शाखा अभियंता वैद्यकीय अधिकारी, पशुधन अधिकारी व ग्रामसेवक यांची प्रत्येक गावासाठी एक पथक याप्रमाणे 86 पथके तयार करण्यात आलेली आहेत.या अभियानामध्ये प्रमुख्याने खालील बाबी करण्यात येणार आहेत.. ➡ पूर बाधित जागेचे सर्वेक्षण करणे ➡ गावात स्वच्छता अभियान राबवून पुरातील सर्व कचरा गोळा करणे ➡ मेलेली जनावरे आणि कचरा यांचे सुयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे ➡ गटारी वाहत्या करणे ➡ पिण्‍याच्‍या पाण्याचे स्रोताचे निर्जंतुकीकरण करणे ➡ पिण्याच्या पाण्याचे स्रोत व पाणीपुरवठा पूर्ववत करणे ➡ गावात रोगराई पसरू नये यासाठी डस्टिंग पावडर व फॉगिंग करणे ➡ वैद्यकीय पथकामार्फत सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करणे ➡ पशुधन अधिकाऱ्यांकडून जनावरांचे तपासणी व लसीकरण करणे ➡ जनावरांसाठी चारा उपलब्धता करणे ➡ गावातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक व खाजगी इमारती व घरे यांची शाखा अभियंता यांचे मार्फत तपासणी करून ते राहण्यायोग्य असल्याची खात्री करणे. या अभियानामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी तसेच स्वयं सहायकांनी सहभाग नोंदवणेसाठी आवाहन करणेत येत आहे.. जे स्वयंसहायक यामध्ये सहभागी होवू ईच्छित आहेत त्यांनी श्रीमती दिपाली पाटील उप मु.का.अ पा.पू.व स्वच्छता यांचेशी संपर्क करावा.. संपर्क क्र 8329671035

  • दिव्यांग मित्र अभियान

    सदर अभियानाची अंमलबजावणी करत असताना पुढीलप्रमाणे प्रमुख उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आली आहेत. १.जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची १००% नोंदणी करून ती संकेतस्थळावर ऑनलाइन उपलब्ध करणे. २.अपंगत्व प्रमाणपत्र नसलेल्या लाभार्थ्यांची तपासणी करून त्यांना अपंगत्व प्रमाणपत्र देणे. ३.तपासणी पश्चात पुढील उपचारांची आवश्यकता असलेल्या दिव्यांगाना संदर्भ सेवा देऊन शासनाच्या विविध योजनांद्वारे उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देणे. ४.दिव्यांगांसाठी उपकरणे आवश्यक असल्यास उपलब्ध करू देणे. (उदा. ३% अपंग निधी, इतर शासकीय योजना, स्वयंसेवी संस्था, सी.एस.आर. इत्यादी ) ५.प्रमाणपत्र प्राप्त लाभार्थ्यांना शासकीय योजनांचे लाभ देण्यासाठी मेळाव्यांचे आयोजन करणे. (उदा. विमा योजनेचा लाभ मिळवून देणे, पेन्शन योजना, एसटी / रेल्वे पास, इतर शासकीय लाभ इत्यादी )