समाज कल्याण विभाग

विविध योजनांची माहिती
अं.क्र.विभागयोजनाकालावधीआवश्यक कागदपत्रे
1 समाज कल्याण विभागअनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करणे योजना • योजना सुरु वर्ष – १९७४ • योजनेचा तपशील – ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना मुलभूत सोई सुविधा पुरविण्यात येतात. • योजनेचे निकष – १) सदर वस्ती अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांची असल्याबाबत बृहत आराखडयामध्ये समावेश असणे आवश्यक २) वस्तीच्या लोकसंख्येच्या व मागील ५ वर्षात दिलेल्या लाभाच्या निकषानुसार रक्कम रु. २ लाख ते २०लाख अनुदान देय आहे. ३) ग्रामपंचायतीचा काम निवडीचा ठराव ४) उप अभियंता यांचे कामाचे अंदाजपत्रक ५) काम करण्यासाठी जागा ग्रामपंचायत मालकीची असलेचा दाखला
2 समाज कल्याण विभागस्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय वस्तीगृहांना सहाय्यक अनुदान सामाजिक न्याय विभागा तर्फे इ. ५ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सांगली जिल्ह्यात ६६ वस्तीगृहे कार्यरत आहेत. वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्याना मोफत भोजन व निवासाची व्यवस्था पुरविली जाते. सदर संस्थाना प्रती विद्यार्थी रु. ९००/- प्रतिमाह असे १० महिन्यासाठी अनुदान दिले जाते.
3 समाज कल्याण विभागअंमली पदार्थ विरोधी मोहीम सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे जिल्ह्यात व्यसन मुक्ती च्या प्रचार व प्रसारासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्था यांना राज्यस्तरीय राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसन मुक्ती सेवा पुरस्कार प्रदान केला जातो. तसेच ज्या व्यसन मुक्ती केंद्रे चालवितात त्यांना रु. ११ लाख इतके अनुदान दिले जाते. दरवर्षी पुणे विभागातून दोन संस्थांची निवड केली जाते.
4 समाज कल्याण विभागस्वयंसेवी संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहांना सहाय्यक अनुदान-निरंक
5 समाज कल्याण विभागशारीरिक दृष्टया अपंगांना शिष्यवृत्ती शाररिक दृष्टया अपंगांना व्यवसायीक प्रशिक्षण पुर्ण केलेल्या व्यक्तींना त्यांना स्वताचा व्यवसाय सुरु करणेसाठी आर्थिक सहाय्य देणेत येते.
6 समाज कल्याण विभागइ.८ वी ते १० वी मध्ये शिकणाऱ्या अनुसुचित जातीच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इयत्ता 8 वी ते 10 वी मधील अनु जातीतील मुलींना दरमहा 100 प्रमाणे शिष्यवृत्ती अदा केली जाते
7 समाज कल्याण विभागमागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण फी, परीक्षा फी मान्यताप्राप्त सर्व स्तरावरील शिक्षण संस्थामध्ये शिक्षण घेणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण फी,परिक्षा फी प्रदान करणेत येते सदर योजना अनु.जाती,अनु जमाती विमुक्त जाती, व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता लागु आहे
8 समाज कल्याण विभागमाध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणीक गुणवत्ता वाढवणेसाठी शासनाने हि योजना सुरु केली आहे. या योजनेनुसार इयत्ता 5 वी ते 10 वी मधील गुणवत्तेप्रमाणे 50% वरील गुण असलेल्या प्रत्येक वर्गातील 1 व 2 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणेत येते.
9 समाज कल्याण विभागइ.५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती  इ.५ वी ते ७ वी व इ. ८ वी ते १० मध्ये शिकणा-या मागासवर्गीय मुलींचे शाळा गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने अनुक्रमे सन १९९६ व सन २००३ पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.
10 समाज कल्याण विभागअस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती सदर व्यवसायात भंगी व्यवसाय,मेहतर व्यवसाय, कातडी सोलने व कातडी कमावणे इ. व्यवसाय करणा-या पालकांच्या मुलांना मॅट्रीकपुर्व शिक्षण घेता यावे या उद्येशाने विद्यावेतन दिले जाते
11 समाज कल्याण विभागआंतरजातीय विवाहित जोडप्यांना प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य या योजनेनुसार 1 व्यक्तीस सवर्ण हिंदु लिंगायत, शिख इतर मागासर्वीय आणि दुसरी व्यक्ती अनु.जाती/अनु.जमाती/विमुक्त जाती/भटक्या जमाती/नवबौध्द असणे आवश्यक आहे.
12 समाज कल्याण विभागअनुसुचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास करणे योजनेचे स्वरुप : दलित वस्त्यामध्ये मुलभुत सुविधा जसे- पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सिमेंट रस्ते/नाली बांधकाम, स्वच्छता विषयक सोयी, मलनिस्सारण, वीज, वस्तीला जोडणारे रस्ते, समाज मंदिर इत्यादी व्यवस्था करुन दलित वस्तीची सर्वांगीण सुधारणा करण्यासंबंधी ही योजना आहे. नियम, अटी व पात्रता इ. : सदर काम मागासवर्गीय वस्ती मध्येच करणे आवश्ययक. वस्तीचा बृहत आराखडा तयार करुन त्यानुसार तथा वस्तीच्या आवश्य्कतेनुसार कामे घेण्या्त येतात. लोकसंख्येच्या सुधारित निकषानुसार प्रत्येक दलित वस्तीला लोकसंख्येच्या प्रमाणात खालीलप्रमाणे अनुदान देण्यात येते.
13 समाज कल्याण विभागलघुउद्योगांसाठी नि:समर्थ व्यक्तीना(अपंग) वित्तीय सहाय्य या योजनेखाली अपंग व्यक्तींना प्रकल्प खर्चाच्या 20% आथवा कमाल रु 30000/- समाज कल्याण विभागाकडुन अनुदान बिज भांडवल स्वरुपात देणेत येते.उर्वरीत 80% भाग बॅकेकडुन कर्ज स्वरुपात उपलब्ध होतो.
14 समाज कल्याण विभागअंमली पदार्थ सेवन विरोधी मोहीम स्वयंसेवी संस्थांना सहाय्य व्यसनमुक्ती प्रचार कार्यालयाच्या अंतर्गत ग्रामीण/शहरी भागामध्ये प्रचाराचे विविध कार्यक्रम राबविणेत येतात त्यामध्ये किर्तन भजन,कलापथक इ त्याचप्रमाणे शाळा कॉलेज यांच्यामध्ये अनुक्रमे संस्कारमंच व नशाबंधी विवाहमंच तसेच ग्रामीण भागामध्ये महिला मंडळी युवा मंडळी याद्यारे व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
15 समाज कल्याण विभागअपंग व्यक्तींना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञान याकरिता अर्थसहाय्य देणे अ) अंध व्यक्तीसाठी- मोबईल फोन, लॅपटॉप,/ संगणक (जॉस सॉफ्टवेअर), बेल, नोट वेअर, Communication equipment Braille attachment telephone, adapted walers , ब्रेल लेखन साहित्य, ब्रेल टाईपरायटर, टॉकींग टाईपरायटर, लार्ज प्रिंट बुक, अल्पदृष्टी अपंगत्वावर मात करणेसाठी digital magnifiers इत्यादी साधने व उपकरणासाठी अर्थसहाय्य देणे. ब) कर्णबधीर व्यक्तीसाठी :- विविध प्रकारची वैयक्तिक श्रवणयंत्रे (बीटीईसह) शैक्षणिक संच, संवेदन उपकरणे, संगणकासाठी सहाय्यभूत उपकरणे क) अस्थिव्यंग व्यक्तीसाठी :- कॉलीपर्स, व्हीलचेअर, तीनचाकी सायकल, स्वयंचलीत तीन चाकी सायकल, कुबड्या, कृत्रिम अवयव, प्रोस्थेटिक अॅण्ड डिव्हायसेस, वॉकर, सर्जिकल फुटवेअर, स्प्लीटस, मोबालिटी एड्स, कमोड स्टुल, स्पायनल ऑण्ड निल वॉकी ब्रेस, डिव्हायसेस फॉर डेली लिव्हींग इत्यादी. ड) मतिमंद व्यक्तीसाठी:- मतिमंदासाठी शैक्षणिक साहित्य संच (MR kits), बुद्धीमत्ता चाचणी संच, सहाय्यभूत उपकरणे व साधने तसेच तज्ञाने शिफारस केलेली अन्य सहाय्यभूत साधणे. इ) बहुविकलांग व्यक्तीसाठी :- संबंधित क्षेत्रातील तज्ञाने शिफारस केलेली सुयोग्य सहाय्यभूत साधने व उपकरणे, सी.पी.चेअर स्वयंचलीत सायकल व खुर्ची, संगणक वापरण्यासाठी सहाय्यभूत उपकरणे. फ) कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्ती :- कुष्ठरोगमुक्त अपंगांसाठी कृत्रिम अवयव व साधणे, सर्जिकल अॅण्ड करेक्टीव्ह फूटवेअर्स, सर्जिकल अप्लांसेंस, मोबालिटि एड इत्यादी. अपंग व्यक्तीना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे.(व्हेन्डीग स्टॉल/पिठाची गिरणी/शिलाई मशीन/मिर्ची कांडप मशीन/फूड प्रोसेसिंग युनिट/झेरॉक्स मशीन इत्यादी) अपंग शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट न लावता शेतीविषयक औवजारे, मोटरपंप, विहीर खोदणे, गाळ काढणे, पाईपलाईन करणे, मळणीयंत्र, ठिबक सिंचन इत्यादीसाठी व बी-बियाणांसाठी अर्थसहाय्य देणे. अपंग शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायासाठी (शेळीपालन, कुक्कुटपालन,वराहपालन,मत्स्य व दुग्ध व्यवसाय इत्यादीसाठी अर्थसहाय्य देणे.) अपंग शेतकऱ्यांना फळबागासाठी अर्थसहाय्य देणे. मतिमंद व्यक्तीकरीता नॅशनल ट्रस्टमार्फत राबविण्यात येणाऱ्या निरामय योजनांचे हप्ते (प्रिमियम) भरणेसाठी अर्थसहाय्य देणे. अपंग विद्यार्थ्यांना सर्व समावेशक शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याकरिता त्यांचा मदतनिसांना मदतनिसाना भत्ता देणे. केंद्र शासनाच्या लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी पुर्वतयारी करीता स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांच्या शुल्काची रक्कम देणे. सामाजिक अत्याचाराला बळी पडलेल्या पिडीत अपंग महिलांना त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी अर्थसहाय्य देणे. अपंग व्यक्तीना दुर्धर आजाराच्या वैदयकीय उपचारासाठी अर्थसाहाय्य देणे. उदा. कॅन्सर, क्षयरोग, मेंदूचे विकार, ह्रद्य शस्त्रक्रिया इत्यादी अपंग प्रमाणपत्र वितरीक करण्याकरीता विशेष मोहिम व शिबीराचे आयोजन करणे.
16 समाज कल्याण विभागअपंग व्यक्तींना विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे अपंग व सदृढ व्यक्तीमधील विषमतेची दरी कमी करणे, समाजात सामाजिक ऐक्याची भावना दृढ व्हावी, समाज एकसंध रहावा व त्याच्यात भातृभाव निर्माण व्हावा म्हणून ही योजना राबविली जाते. अटी व शर्ती 1)अर्जदार ग्रामीण भागातील असावा. 2.विवाह नोंदणी अधिकारी यांचेकडील विवाहाचा दाखला 3. वधू व वर यांचा शाळा सोडल्याचा दाखला 4.वधू किंवा वर (अस्थिव्यंग, मतिमंद किंवा मुकबधीर 40% तसेच अंध 100 %) अपंगत्वाचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडील वैद्यकीय प्रमाणपञ व सदृढ व्यक्तीस कोणत्याही प्रकारचे अपंगत्व नाही असे प्रमाणपञ असणे आवश्यक आहे. 5.आंतरजातिय किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसेल याबाबत ग्रामसेवकाचा दाखला आवश्यक. 6.लग्नाच्या तारखेस वराचे वय 21 वर्षे व वधूचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. 7. ग्रामसेवक व सरपंच यांचेकडील शिफारसपञ असणे आवश्यक. 8. गटविकास अधिकारी यांचेकडील शिफारस पञ. 9. अर्जदारांचा एकञित फोटो असावा. 10. प्रत्येक अपंग व सदृढ विवाहीत जोडप्यास 50000/-रु. धनाकर्षाद्वारे अनुदेय देय राहिल. 11. वधू व वर यांचे रेशनकार्ड याची प्रत. 12. 1/04/2007 नंतर विवाह झालेल्या दांपत्यास सदर योजनेचा लाभ देणेत येईल. 13. वरील अटींची पूर्तता नसलेले व अपूर्ण अर्ज दप्तरी दाखल करून निकाली काढणेत येतील व त्याबाबत पञव्यवहार केला जाणार नाही. अर्ज कोठे मिळेल: ग्रामपंचायत विभाग, पंचायत समिती कार्यालय तसेच जिल्हा समाजकल्याण आधिकारी , जि.प. सांगली अर्ज कोणाकडे करावा : गटविकास अधिकारी पं.स. यांचेमार्फत जिल्हा समाजकल्याण अधिकारी जि.प. यांचेकडे सादर करावा. लाभार्थीची निवडीची पध्दत परिपूर्ण प्रस्तावास विषय समिती कडून मंजूरी घेतली जाते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
अं.क्र.विभागप्रश्नउत्तर
1 समाज कल्याण विभागप्रस्ताव करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, चेकलिस्ट आहे काय ?या चेकलिस्टनुसार साक्षांकित कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव विहीत नमुन्यामध्ये करावा. प्रस्ताव ०२ प्रतीत गटविकास अधिकारी यांचेमार्फत किंवा प्रत्यक्ष या कार्यालयास सादर करणेत यावा.
2 समाज कल्याण विभागशासनाकडून किती रुपये अनुदान दिले जाते ?दि.०१.०२.२०१० पुर्वी लग्न केलेल्या दांपत्यांना रू १५,०००/- तर या दिनांकानंतर लग्न केलेल्या दांपत्यांना रू. ५०.०००/- इतके अनुदान दिले जाते.
3 समाज कल्याण विभागमानधन केव्हा जमा होईल?सदर योजनेअंतर्गत कलाकाराचे मानधन सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई कार्यालयामार्फत थेट कलाकाराच्या बँक खात्यात जमा केले जात असल्यामुळे सदर बाबतीत हे कार्यालय अनभिज्ञ असल्यामुळे माहिती देवू शकत नाही. तसेच मानधन प्राप्त होत नसल्यास कलाकाराने या कार्यालयाकडे लेखी तक्रार केल्यास सदर तक्रारी मा. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांचेकडे पाठवून पाठपुरावा करण्यात येईल.
4 समाज कल्याण विभागप्रस्ताव मंजुर झाला काय ?सांगली जिल्हास्तरीय वृध्द कलाकार व सांस्कृतिक समितीच्या शिफारशीनंतर मा. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांचेकडून मंजुरी आदेश प्राप्त झाल्यानंतर कलाकाराचा प्रस्ताव मंजुर होऊन त्यास मानधन सुरु होते.
5 समाज कल्याण विभागपथदिव्यांचा प्रस्ताव करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?योजनेच्या या चेकलिस्टनुसार पथदिव्यांचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने संबधित गटविकास अधिकाऱ्यांच्या शिफारशीसह पंचायत समितीमार्फत या कार्यालयास सादर करावयाचा आहे.
6 समाज कल्याण विभागप्रस्ताव कधी मंजुर होतात?परिपूर्ण प्रस्तावांना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने मंजुरी दिली जाते व पथदिवे बसविण्याचा मंजुरी आदेश अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. सांगली यांना दिले जातात.
7 समाज कल्याण विभागप्रस्ताव करण्यासाटी कोणती कागदपत्रे लागतात तसेच अर्जाचा नमुना भेटेल का?योजनेच्या विहीत नमुन्यातील अर्जामध्येच प्रस्तावास आवश्यक कागदपत्रे नमुद केलेली आहेत. सदर कागदपत्रांच्या सत्यप्रती प्रस्तावास जोडून मुळ कागदपत्रांसह वैयक्तिकरित्या हजर राहून कार्यालयास सादर करावा.
8 समाज कल्याण विभागप्रस्तावास लाभ केव्हा देण्यात येईल ?शासनाकडून अनुदान प्राप्त होताच प्रस्ताव सादर केलेल्या दिनांकानुसार क्रमवारी लावून प्रस्ताव मंजुर केले जातील व मंजुर यादीमध्ये नाव असल्याचे व संबंधित धनाकर्ष घेवून जाण्याबाबत या कार्यालयाकडून पत्राद्वारे व दूरध्वनीद्वारे कळविले जाईल.
9 समाज कल्याण विभागअनु.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजने अंतर्गत पाणी पुरवठा सुविधा/गटार/जोडरस्ते/समाजमंदीरांचे प्राप्त झालेले प्रस्ताव मंजुर का होत नाहीत?सदरचे काम, बृहत आराखड्यात असणे आवश्यक आहे. :- सदर वाडी/वस्ती अंदाजपत्रकानुसार अनुज्ञेय रक्कम शिल्लक असणे आवश्यक आहे. :- चेकलिस्टप्रमाणे प्रस्ताव परिपूर्ण असणे आवश्यक आहे. :- सदर कामास समाज कल्याण समितीने मंजुरी देणे आवश्यक आहे. :- समाजकल्याण समितीने निवड केलेल्या कामांचे प्रस्ताव अपूर्ण असल्यास ते परिपुर्ण करण्याकरीता संबधित ग्रामपंचायतीला/गटविकास अधिकाऱ्यांना त्याबाबतीत कळविले जाते व प्रस्ताव परिपूर्ण करण्याची कार्यवाही करणेत येते. :- आर्थिक वर्षात प्राप्त अनुदान वाटप करताना तालुकानिहाय अनुसुचित/नवबौध्द घटकांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाटप करण्यात येते.
10 समाज कल्याण विभागजिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून ३% सेस योजनेतून नि:समर्थ व्यक्तीना कोणते वैयक्तीक लाभ दिले जातात?जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत नि:समर्थ व्यक्तींच्या कल्याणाकरीता खालील वैयक्तीक लाभाच्या योजना निश्चित केल्या असून सदर योजनेसाठी लाभार्थ्यांना अर्थसहाय्य पुरविणेत येते.
11 समाज कल्याण विभागजिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून ३% सेस योजनेअंतर्गत नि:समर्थ व्यक्तीना दिल्या जाणाऱ्या वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी अर्जा सोबत कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत नि:समर्थ व्यक्तीच्या कल्याणाकरिता दिल्या जाणाऱ्या वैयक्तीक लाभाच्या योजनांसाठी अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्र जोडाणे आवश्यक आहेत. १) मा. सरपंच यांचा गावचा रहिवाशी असल्याचा दाखला. २) जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रत. ३) लाभार्थ्यांचे नांव असलेल्या रेशनकार्डची प्रत. ४) लाभार्थ्यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्राची प्रत. (मा. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ऑनलाईन केलेले अर्जातील अनु.क्र.१ चे अनुषंगाने) ५) लाभार्थ्यांच्या बँक पासबुकाची प्रत.(अर्जातील अनु.क्र. ३ व ४ चे अनुषंगाने) ६) लाभार्थ्यांच्या आधार कार्डची प्रत.(अर्जातील अनु.क्र. ५ चे अनुषंगाने) ७) शासन निर्णय क्र. अपंग २०१५/प्र.क्र.१३७/वित्त-३, दि. २४ नोव्हेंबर, २०१५ मधील ‘ब’ वैयक्तीक लाभाच्या योजनांमधून कोणती वस्तू/साहित्य घेवू इच्छिता त्या साहित्याचे वैशिष्ट्य(Specification) व बाजारभाव दर्शविणारे माहितीपत्राची प्रत (कोटेशन) (अर्जातील अनु.क्र. ७ व ८ चे अनुषंगाने) ८) नि:समर्थ व्यक्तीनी सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञानाकरीता अर्थसहाय्य मागणी प्रस्तावासोबत त्या क्षेत्राशी संबधीत तज्ञाचे शिफारसपत्र जोडावे. ९) नि:समर्थ व्यक्तीनी व्यवसाय उद्योग धंद्यासाठी अर्थसहाय्य मागणी करताना त्यांचे वय १८वर्षे पुर्ण असावे.
पदांचा तपशील
माहिती उपलब्ध नाही
नागरिकांची सनद
माहिती उपलब्ध नाही
Employee Corner
नाव :
पदनाम :
मोबाईल नंबर :
विषय :
अर्जाचा तपशील :