थोर विभूती/स्वातंत्र्यसेनानी

क्रांतिसिंह नाना पाटील

जन्म - ३ ऑगस्ट १९००

मृत्यू - ६ डिसेंबर १९७६

पूर्ण नाव - नाना रामचंद्र पाटील

मुळगाव - येडेमच्छिंद्र, ता. वाळवा

शिक्षण - फायनल


सत्यशोधक चळवळीचा प्रचार

१९२०-(डिसेंबर) सुरली सजा, तालुका-कराड येथे तलाठी म्हणून नेमणूक

१९३०-सविनय कायदेभंग चळवळीत भाग

१९४०-बोरगावात वैयक्तिक 'सत्याग्रहाबद्दल' ९ महिने शिक्षा

१९४२-चळवळीत आपला आपण करू कारभार हे सूत्र अंमलात आणले. इस्लामपूर, तासगाव, वडूज, पाठण या तालुक्यात मोर्चे

१९४३-तुफानी सेनेची उभारणी आणि प्रतिसरकार उर्फ पत्री सरकारची स्थापना, शेवटपर्यंत भूमिगत

१९४२-४६ - भूमिगत

१९४६-वॉरंट मागे घेतल्यानंतर जाहीर सभेत प्रकट

१९५७-उत्तर सातारा मतदार संघातून लोकसभेवर निवड

१९६७-कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून बीड मतदार संघातून लोकसभेवर निवड

झेंडा रोवण्याची मोहीम

ध्वजारोहण, सत्याग्रह, दुष्काळी परिषदा, इ. कारणांनी ते १९२० ते १९४२ या काळात ८/१० वेळा तुरुंगात गेले. पकड वॉरंट, जमीन, घरदार, इस्टेट जप्त


नागनाथ रामचंद्र नायकवडी

जन्म - १५ जुलै १९२२

मृत्यू - २२ मार्च २०१२

पूर्ण नाव - नागनाथ रामचंद्र नायकवडी

मुळगाव - वाळवा, ता. वाळवा

शिक्षण - मॅट्रिक


१९३९-राष्ट्रसेवादलात सहभाग

१९४२-सालच्या चलेजावच्या चळवळीत भूमिगत राहून मोडतोड व जाळपोळीत भाग, अटक, तथापी, दोन महिन्यांनी सातारा जेलमधून पलायन व भूमिगत राहून कार्य

१९४६-साली वॉरंट रद्द झाल्यावर प्रगट

१९४३-शेणोली जवळ पे-स्पेशल रेल्वे तसेच धुळे येथील पाच लाखाच्या सरकारी खजिना लुटीत सहभाग.

१९४३-सांगाव(कोल्हापूर) पोलीस चौकीतून बंदुका पळवल्या.

१९४६-मणदूर व सोनवडे येथे सशस्त्र चकमक, स्वतंत्र प्राप्तीनंतर आण्णा गोवा मुक्ती आंदोलन, मराठवाडा मुक्ती संग्राम व संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात सक्रीय. महाराष्ट्र धरण व प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष

१९५७-संयुक्त महारष्ट्र समितीचे उमेदवार आमदार

१९८०-हुतात्मा किसन अहिर कारखाना सुरु केला. हुतात्मा पॅटर्न सुरु केला.

१९८५-अपक्ष म्हणून वाळवा विधानसभेचे प्रतिनिधीत्व

२००९-पद्मभूषण पुरस्कार, महाराष्ट्र फाऊंडेशन जीवन गौरव पुरस्कार

इतर कार्ये-भूमिहीन, शेतमजूर चळवळ, कष्टकरी-शेतकरी-शेतमजूर परिषद, पाणी परिषद, दुष्काळी जनावरांचे कॅम्प, काळम्मावाडी, वारणा-कोयना, धरणग्रस्तांचा लढा, ग्रामीण साहित्यसंमेलन व विद्रोही सांस्कृतिक चळवळीसाठी आधार दिला.

कर्मवीर भाऊराव पाटील

जन्म - २२ सप्टेंबर १८८७

मृत्यू - ९ मे १९५९

पूर्ण नाव - भाऊराव पायगोंडा पाटील

मुळगाव - ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा

शिक्षण - इंग्रजी सहावी


सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणतज्ञ, महाराष्ट्राचे ज्ञानयोगी

१९२०-कराडजवळ काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना

१९२४-सातारा येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना व श्री छत्रपती बोर्डींग ची स्थापना

जननेते 'कर्मवीर' पदवी, पुणे विद्यापीठाकडून डी.लिट.पदवी, भारत सरकारकडून 'पद्मभूषण' किताब

'कमवा व शिका' योजना, महाराष्ट्रभर रयत शिक्षण संस्थेच्या शाखांची स्थापना, स्पृश्य व अस्पृश्य विद्यार्थी वस्तीगृह, असहकार चळवळीत सहभाग, स्वदेशीचा स्वीकार, स्वालंबी शिक्षणाचा पुरस्कार, अनेक शाळा व कॉलेज ची स्थापना.

सहकार महर्षी गुलाबराव पाटील

जन्म - सप्टेंबर १९२१

मृत्यू - जानेवारी १९८९

पूर्ण नाव - गुलाबराव रघुनाथराव पाटील

मुळगाव - सांगली


सहकाराचे तत्वचिंतक, देशातील सहकारी चळवळीचे प्रबोधनकार

१९५४-५५ सांगलीचे नगराध्यक्ष

१९५७-६३ सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष

१९६३-६९ महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थाचे अध्यक्ष

१९६०-६६ प्रादेशिक सहकारी मंडळाचे अध्यक्ष

१९६६-७८ राज्यसभेवर काम करण्याची संधी

१९७३-७५ राष्ट्रीय सहकारी संघाचे सरचिटणीस

प्रसिध्द भाषांसंग्रह-'सहकाराची नवी दिशा'

माजी मुख्यमंत्री व सहकार महर्षी वसंतराव बंडूजी पाटील

जन्म - १३ नोव्हेंबर १९१७

मृत्यू - ०१ मार्च १९८९

पूर्ण नाव - वसंतराव बंडूजी पाटील

मुळगाव - पद्माळे, सांगली जिल्हा, महाराष्ट्र

शिक्षण - इ. ७ वी. (मराठी माध्यम)


महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील होत. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी - असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अनेक लढे नोंदवले असतील,पण ब्रिटिश सत्तेच्या छाताडावर लाथ मारत सांगली जिल्ह्यातील जिगरबाज क्रांतिकारकांनी जी उडी मारली होती ती नुसतीच ऐतिहासिक नव्हती तर ब्रिटिश हुकमतीला कृष्णेच्या पाण्याची ताकत दाखवणारी होती. सांगलीचे जेल फोडून, त्याच्या तटावरून पूर आलेल्या कृष्णेत ज्या बहाद्दर स्वातंत्र्य सैनिकांनी उड्या घेतल्या,त्यात वसंत दादा अग्रभागी होते. त्यांच्या शौर्याला अनेक अनेक सलाम.

सांगली जिल्ह्यातील, मिरज तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. तसेच स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढील काळात सुमारे २५ वर्षे त्यांनी सांगलीचेच प्रतिनिधित्व (विधानसभेत व लोकसभेत) केले. राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदी संस्था-संघटनांची अध्यक्षपदे सांभाळली. पक्ष कार्याला त्यांनी विशेष महत्त्व दिले. वसंतदादांनंतर काँग्रेस पक्ष संघटनेला एवढे बळ देणारा नेता पुढे काँग्रेसला महाराष्ट्रात मिळालाच नाही. (तसेच प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रभाव कायम राहण्यात व वाढण्यात दादांचाच वाटा मोठा आहे,) असे राजकीय निरीक्षक म्हणतात. सत्तेची हाव नसलेला सत्ताधारी, असे दादांबद्दल म्हटले जाते.

सहकार क्षेत्रातील या अद्वितीय कामगिरीमुळेच १९६७ मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले. वसंतदादा १९५२ पासून लोकप्रतिनिधी होते, १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले, व नंतर मंत्री -मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. विशेष म्हणजे १९५२ ते १९७२ दरम्यान त्यांनी सहकार क्षेत्रातील बहुतांश कार्य केले. या पार्श्वभूमीवर दादांनी ज्या काळात सहकार क्षेत्राची पायाभरणी व विस्तार केला तो काळ १९५२ ते १९७२ असल्याचे लक्षात येते. विशेष म्हणजे सत्तास्थानांवर नसताना त्यांनी सहकाराचा प्रचार-प्रसार-विकास केला हे लक्षणीय ठरते.

स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या विविध प्रकारच्या अनुभवांचे संचित, स्मरणशक्ती, नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, समाजमन-आकलन शक्ती, निर्णयक्षमता, शेतकरी व ग्रामीण समाजजीवनाची अचूक, परिपूर्ण जाणीव - इत्यादी गुणांच्या आधारे वसंतदादांनी महाराष्ट्राचा विकास साधला. १९१८ मध्ये प्लेगच्या साथीत दादांच्या आई-वडिलांचा एकाच दिवशी मृत्यू झाला होता. त्या वेळी केवळ एक वर्षाचे असणार्‍या दादांचा सांभाळ, पुढील आयुष्यात त्यांच्या आजीने केला होता. या परिस्थितीत दादा जास्त शिकू शकले नाहीत. पण पुढील आयुष्यात त्यांनी केलेल्या विकास-कार्याची फळे आज महाराष्ट्र चाखतो आहे. म्हणूनच दुर्दैवाने फार शिकू न शकलेला, पण तरीही सर्वांत शहाणा नेता या समर्पक शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते.

यशवंतराव बळवंतराव चव्हाण

जन्म - १२ मार्च १९१३

मृत्यू - २५ नोव्हेंबर १९८४

पूर्ण नाव - यशवंतराव बळवंतराव चव्हाण

मुळगाव - ढवळेश्वर, ता.खानापूर


१९४२-कायदेभंग चळवळीत सहभाग, १८ महिने तुरुंगवास

१९४२-चलेजाव आंदोलनात सहभाग

१९४६-मुंबई इलाका कायदेमंडळाच्या निवडणुकीत व सातारा मतदार संघात निवड

१९५६-द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून निवड

१९६०-महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री(१ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२) युद्धावेळी

१९६२-भारताचे संरक्षणमंत्री म्हणून नेमणूक

१९६३-नाशिक जिल्ह्यामधून लोकसभेवर बिनविरोध निवड

१९६६-१४ नोव्हेंबर केंद्रीय गृहमंत्रीपदी नियुक्ती

१९६९-कानपूर-विश्वविद्यालयातर्फे 'डॉक्टर ऑफ लॉ' बहाल

१९७०-केंद्रीय अर्थमंत्री म्हणून नियुक्ती

१९७२-सातारा मतदार संघातून लोकसभेवर निवड

१९७४-केंद्रीय परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती

१९७७-७८ विरोधी पक्षनेता म्हणून निवड

१९७९ चरणसिंग यांच्या संयुक्त मंत्रिमंडळात उपपंतप्रधान

१९८०-सातारा मतदार संघातून लोकसभेवर निवड

१९८२-आठव्या अर्थ आयोगाचे अध्यक्ष

१९८४-कृष्णाकाठ आत्मचरित्र प्रसिद्ध

ग्रंथसंपदा/लेखन

आपले नवे मुंबई राज्य(इ.स.१९५७)

ऋणानुबंध(आत्मचरीत्र लेख १९७५)

कृष्णाकाठ (आत्मचरित्र १९४८, भूमिका १९७९)

महाराष्ट्र राज्यनिर्मिती विधेयक (१९६०)

विशेष दर्शन (पत्रांचा संग्रह)१९८८

ग्रंथसंपदा/लेखन

पंचायतराज त्रिस्तरीय योजना

राज्य पंचवार्षिक योजनांचा प्रारंभ

कोल्हापूर प्रकारच्या बंधाऱ्याचा प्रचार

कोयना, उजनी या प्रमुख प्रकल्पांना गती

१८ सहकारी कारखान्यांची स्थापना (सहकाराला चालना)

मराठवाडा व शिवाजी विद्यापीठाची स्थापना (शैक्षणिक विकास)

कृषिविद्यापिठाच्या स्थापनेतही संकल्पनात्मक सहभाग (कृषी विकास)

मराठी साहित्य संस्कृती महामंडळ व विश्वकोश मंडळाची स्थापना (सांस्कृतिक विकास)

गणपती दादासाहेब लाड

जन्म - १९२२

पूर्ण नाव - गणपती दादासाहेब लाड(जी.डी.लाड)

मुळगाव - कुंडल, ता.तासगाव

शिक्षण - इंटरपर्यत

१९४२-सालच्या स्वातंत्र चळवळीत भूमिगत कार्य. प्रतिसरकारच्या स्थापनेत पुढाकार.

१९५७-मध्ये मुंबई राज्य विधानसभेवर निवड

१९६२-मध्ये विधान परिषदेवर सदस्य व उपप्रतोप समिती पक्ष

बॅरिस्टर टी.के.शेंडगे

जन्म - २५ मार्च १९१७

पूर्ण नाव - टी.के.शेंडगे

मुळगाव - पेड ता.तासगाव


१९५८-इंग्लंड येथे जावून बॅरिस्टर पदवी

धनगर समाजोन्नती मंडळाची स्थापना

१९६२ साली आमदार

१९६२-१९६७ विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली

वि.स.पागे

जन्म - २१ जुलै १९१७

मृत्यू - १९९०

पूर्ण नाव - वि.स.पागे

मुळगाव - विसापूर ता.तासगाव

शिक्षण- बी.ए.एल.एल.बी.

स्वातंत्र्यचळवळीत सहभाग

'रोजगार हमी योजना' पहिल्यांदा सुरु करण्याचा बहुमान

१९५२ साली मुंबई राज्य निर्माण झाल्यापासून १९७८ पर्यंत विधानपरिषदेचे सभापती लेखन

'अ प्रायलॉग विध द डिव्हाइन'-इंग्रजी पुस्तक

नाथाजी बाबुराव लाड

जन्म - १९१६

पूर्ण नाव - नाथाजी बाबुराव लाड

मुळगाव - कुंडल, ता.तासगाव

शिक्षण - इ. ५ वी. (इंग्रजी माध्यम)



१९४२-सालच्या चलेजावच्या चळवळीत सभा मिरवणुका व संप मोर्चात भाग, भूमिगत राहून मोडतोड व जाळपोळीत भाग. स्थावर व जंगम इस्टेट जप्त, पकडून देणाऱ्यास सरकारकडून ५०००/- रुपयांचे बक्षिश जाहीर. तथापी, वॉरंट रद्द झाल्यावर १९४६ मध्ये प्रगट.

आण्णासाहेब लठ्ठे

जन्म - ९ डिसेंबर १९७८

मृत्यू - १६ मे १९५०

पूर्ण नाव - आण्णासाहेब बाबाजी लठ्ठे

मुळगाव - कुरुंदवाड

शिक्षण- एम.ए., एल.एल.बी

३.४.१८९९-द.भा.जैन सभेची स्थापना

१९०४-जैन समाजातील पहिले एम.ए.म्हणून दानपत्र

१९०५-द.भा.जैन सभेची घटना तयार केली.

१९०६-कोल्हापूर जैन सभेच्या स्त्रीशिक्षण विभागाचे मंत्री

१९०७-कुरुंदवाड, येथे वकिली. 'प्रगती', जीनविजय साप्ताहिके सुरु.

१९०८-जैन श्रविकाश्रम हि संस्था स्थापन.

९.२.१९०८-अस्पृश्य विद्या प्रसारक मंडळाची स्थापना

१९२४-ब्रिटीश सरकारकडून रावबहादूर पदवी

१.६.१९२५-छ.शाहू महाराजांचे मराठीतून चरित्र प्रसिध्द

२.१०.१९२५-महाराजांचे दिवाण म्हणून नियुक्ती

१९२६-बालविवाहाला बंदी घालणारा कायदा केला.

१६.१०.१९३७-मुंबई इलाक्याचे अर्थमंत्री

१३.६.१९९१-लठ्ठे एज्युकेशनची स्थापना

पहिले चिमणराव पटवर्धन

जन्म - ५ जानेवारी १७७५

मृत्यू - १५ जुलै १८५१

पूर्ण नाव - चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन

मुळगाव - सांगली

६-२-१७७५-सरदारकीची वस्त्रे देण्यात आली.

१२.१२.१७९५-बाबासाहेब फडके यांच्या मुलीशी पुणे येथे विवाह

इ.स.१७९५-खर्ड्याच्या लढाईत सहभाग

इ.स.१८००-१)धोंडोजी वाघाचा पराभव केला २)लॉर्ड वेलस्ली भेट झाली. ३)'सांगली' संस्थानाची राजधानी स्थापन केली.

इ.स.१८०१-गणेशदुर्ग व श्री गणपती मंदिर बांधण्यास प्रारंभ.

इ.स.१८११-'गणेश दुर्ग' चे बाधकाम पूर्ण

इ.स.१८२१-सांगलीत छापखाना सुरु

इ.स.१८३३-'अर्ल आफ क्लेअर' ची सांगली भेट

इ.स.१८४४-गणेश मंदिर बाधकाम पूर्ण

इ.स.१८४६-सांगलीत आंब्याच्या बागा व आमराईची निर्मिती केली.

सांगली संस्थांचे संस्थापक योद्धे (कुशल प्रशासक, कार्य कुशल, दूरदृष्टी, ध्येयनिष्ट)

मराठा साम्राज्याच्या चार आधारस्तंभापैकी पटवर्धन एक घराणे होते.

रामचंद्र कृष्णाजी पाटील

जन्म - १८९९

मृत्यू - १९४६

पूर्ण नाव - रामचंद्र कृष्णाजी पाटील उर्फ चंद्रोजी कारभारी

मुळगाव - कामेरी, ता. वाळवा

शिक्षण - इ. ६ वी.


१९३०-कायदेभंग, चळवळीत सभा व मिरवणुकीत सहभाग

१९३७-या वर्षाच्या निवडणुकीत मुंबई विधानसभेवर

१९४०-४१ युद्धावेळी चळवळीत भाषण

१९४२-चलेजाव चळवळीत भूमिगत राहून कार्य, जाळपोळ, मोडतोडीत सहभाग, स्थावर इस्टेट जप्त

१९४४-अटक परंतु चार महिन्यात पुराव्या अभावी मुक्त परंतु पुन्हा सोळा महिने स्थानबद्ध

देशभक्त दादा आप्पाजी बर्डे

जन्म - १९०८

पूर्ण नाव - देशभक्त दादा आप्पाजी बर्डे

मुळगाव - वाटेगाव, ता.वाळवा

शिक्षण - ट्रेंड प्रायमरी टिचर

१९३०-सालच्या कायदेभंगाच्या चळवळीत सोलापूर येथील मार्शल लॉ विरोधी सभा मिरवणुकीत भाग, लढ्याचे नेतृत्व, नावु महिने सक्त मजुरी व ४०/- रुपये दंड, पेटलोण जंगल सत्याग्रहात भाग, दोन वर्षे दहा महिने सक्तमजुरी व ११०/- रुपये दंड

१९४२-सालच्या चलेजावच्या चळवळीत भूमिगत राहून कार्य. मोडतोड व जाळपोळीत भाग, सरकारकडून पकडून देण्यात सहाय्य करणाऱ्यास ५०००/- रु. बक्षीस जाहीर

१९४४-मध्ये अटक, खून मारामारींच्या आरोपाखाली खटला तथापी, पुराव्यांचे अभावी मुक्त आणि लगेच पुन्हा अटक करून १९४४-४६ सालात २१ महिने स्थानबध्द, मीठ सत्याग्रहात भाग, महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस कमिटीचे सभासद, सातारा जिल्हाचे कार्यकारणीत प्रतिनिधी

मारुती विष्णू कुलकर्णी

जन्म - १९०६

पूर्ण नाव - मारुती विष्णू कुलकर्णी

मुळगाव - चरण, ता.शिरळा

शिक्षण - इ. ५ वी. (मराठी माध्यम)

१९२०-२१ सालच्या बहिष्कार व असहकारतेच्या चळवळीत भाषण केल्याबद्दल एक दिवस अटक, तथापी, अल्पवयीन म्हणून मुक्त.

१९३०-सालच्या कायदेभंगाच्या चळवळीत बिळाशी येथे जंगल सत्याग्रहात भाग, सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा व २००/- रुपये दंड

१९४२-सालच्या चलेजावच्या चळवळीत भूमिगत राहून कार्य, मोडतोड व जाळपोळीत भाग. स्थावर व जंगम इस्टेट जप्त, पकडून देणाऱ्यास सरकारकडून ५०००/- रुपयांचे बक्षीस जाहीर, दि. २१/१०/१९४४ रोजी प्रगट, पुन्हा अटक, तथापी चार महिन्यांनी पुराव्याचे अभावी मुक्त, परंतु लगेच पुढे दहा महिने स्थानबद्ध

अनंत कृष्णा बर्डे

जन्म - १९०६

मृत्यू - १९५९

पूर्ण नाव - अनंत कृष्णा बर्डे

मुळगाव - वाटेगाव, ता.वाळवा

शिक्षण - इ. ७ वी. (मराठी माध्यम)

१९३०-३२ सालच्या कायदेभंगाच्या चळवळीत सभा-मिरवणुकीत भाग, सहा महिने सक्तमजुरी

१९४२ सालच्या चलेजावच्या चळवळीत भूमिगत राहून मोडतोड व जाळपोळीत भाग, स्थावर व जंगम इस्टेट जप्त, पकडून देणाऱ्यास सरकारकडून ३०००/- रुपयांचे बक्षीस जाहीर, तथापी वॉरंट रद्द झाल्यावर १९४७ मध्ये प्रकट

गणपतराव रामचंद्र पाटील

जन्म - १९१४

मृत्यू - १९७०

पूर्ण नाव - गणपतराव रामचंद्र पाटील

मुळगाव - बिळाशी, ता.शिरळा

शिक्षण - इ. ७ वी. (मराठी माध्यम)

१९४२-सालच्या चलेजावच्या चळवळीत पाटीलकीचा राजीनामा, चरण बिळाशी भागात भूमिगत कार्य, घरदार व जमीनजुमला जप्त, पकडून देणाऱ्यास ३०००/- रुपयांचे बक्षीस जाहीर.

१९४४-मध्ये प्रगट तेव्हा अटक. पण पुराव्याच्या अभावी सुटका, लगेच दीड वर्ष स्थानबद्ध

निवृत्ती आकारम पाटील

जन्म - १९०२

पूर्ण नाव - निवृत्ती आकारम पाटील

मुळगाव - कुरळप, ता.वाळवा

शिक्षण - इ. ७ वी. (मराठी माध्यम)

१९३०-३२ सालच्या कायदेभंगाच्या चळवळीत, सभा मिरवणुकीत जंगल सत्याग्रह व दारू पिकेटिंगचे कार्यात भाग

१९४२-सालच्या चलेजावच्या चळवळीत भूमिगत राहून कार्य, मोडतोड व जाळपोळीत भाग, स्थावर जंगम इस्टेट जप्त, पकडून देणाऱ्यास ५०००/- रुपयांचे बक्षीस जाहीर. वॉरंट रद्द झाल्यास प्रगट.

धोंडीराम तुकाराम माळी

जन्म - १९१८

पूर्ण नाव - धोंडीराम तुकाराम माळी

मुळगाव - कुपवाड, ता.मिरज

शिक्षण - इ. ७ वी. (मराठी माध्यम)

१९४०-१९४१ सालच्या युद्धविरोधी वैयक्तिक सत्याग्रह सभेत भाषण, तीन महिने सक्तमजुरी.

१९४२-सालच्या चलेजावच्या चळवळीत भूमिगत राहून मोडतोड व जाळपोळीचे कार्यात भाग. स्थावर इस्टेट जप्त.

१९४४-मध्ये अटक व अनेक खटले भरले, पैकी सांगली कोर्टात दीड वर्ष सक्त मजुरी व १०० रुपये दंड, सेशन कोर्टात १९४६ मध्ये २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा. तथापी, १९४६ मध्ये मुक्त.

विरोजे भाऊसाहेब सत्याप्पा

जन्म - १९१८

पूर्ण नाव - विरोजे भाऊसाहेब सत्याप्पा

मुळगाव - मालगाव, ता.मिरज

शिक्षण - इ. ७ वी. (मराठी माध्यम)


१९४२-सालच्या चलेजावच्या चळवळीत सभा मिरवणुकीत सहभाग, सहा महिने स्थानबद्ध, भूमिगत राहून जाळपोळ व मोडतोडीत भाग, इस्टेट जप्त, पकडून देणाऱ्यास १०००/- रुपयांचे बक्षीस जाहीर.

१९४३-मध्ये अटक. जयसिंगपूर कोर्टात केस चालू असताना पोलिसांच्या रायफली घेवून फरारी

१९४४-साली अटक. तथापी तीन महिन्यांनी सरकारने सार्वत्रिक माफीत खटले काढून घेतलेले मुक्त

पांडुरंग गोविंद पाटील

जन्म - १९०६

पूर्ण नाव - पांडुरंग गोविंद पाटील

मुळगाव - येडेनिपाणी, ता.वाळवा

शिक्षण - इ. ७ वी. (मराठी माध्यम)

१९३०-सालच्या कायदेभंगाच्या चळवळीत अटक, तथापी, गांधी आयर्विन कराराचे सार्वत्रिक माफीत खटला रद्द झाला. त्यामुळे मुक्त १९३२ सालात २ महिने स्थानबद्ध सुटकेनंतर लगेच सभा, मिरवणुकीत सहभाग नऊ महिने सक्तमजुरी व १००/- रुपये दंड अशी शिक्षा.

१९४०-साली युद्धविरोधी भाषणाबद्दल तीन महिने सक्तमजुरी

१९४२-साली सभा-मिरवणुकीत भाग, अटक स्थानबद्ध तथापी , येरवडा जेल फोडून पालीन गेले व भूमिगत राहून कार्य

१९४३-मध्ये अटक व चार महिने सक्तमजुरी

१९४३-मध्ये मुक्त व स्थानबद्ध करू पाहणाऱ्या पोलिसांच्या हातून निसटले. पुन्हा भूमिगत राहून कार्य. पकडून देणाऱ्यास सरकारने ३०००/- रुपयांचे बक्षीस जाहीर केले. तथापी, वॉरंट रद्द झाल्यावर एप्रिल १९४६ मध्ये प्रकट

स्वामी रामानंद भारती

जन्म - १८९७

पूर्ण नाव - स्वामी रामानंद भारती

मुळगाव - सांगली

१९३०-सालच्या मीठ सत्याग्रहात बंगाल बिहार मध्ये प्रचार कार्य

१९४०-पासून सातारा जिल्ह्यात कॉंग्रेसच्या कार्यात भाग

१९४२-सालच्या चलेजाव च्या चळवळीत भूमिगत कार्य. पकडण्यासाठी सरकारकडून एक हजार रुपयांचे बक्षीस. अटक व दोन वर्षाची शिक्षा. नंतर भूमिगत कार्य. सरकारने ३ खटले भरले.

१९४६-साली कॉंग्रेस मंत्रीमंडळाने ते काढून टाकले.

१९४६-साली सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सभासद

१९५३-पासून सांगली जिल्ह्यातील विकास योजनांमध्ये मार्गदर्शन.